बेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण, `तो` Video Viral
दीपिका आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या उत्तम डान्ससाठी ओळखली जाते. ऐश्वर्यानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या डान्स फॉर्म केल्याचे आपण पाहिले आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच ऐश्वर्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी तिच्या एका व्हिडीओत बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण (Deepika Padukone) दिसत आहे. त्या दोघांमध्ये असलेली बॉन्डिंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
हा व्हिडिओ ईशा अंबानीच्या लग्नाआधीच्या पार्टीचा आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान ऐश्वर्या-अभिषेक, रणबीर-दीपिकाचे अनेक इनसाइड व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या व्हिडीओत पहिले अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते 'दिल धडकने दो' या चित्रपटातील 'गल्ला गुडिया' या गाण्यावर डान्स करत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या मग्न होऊ डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या दीपिकासोबत डान्स करताना दिसत आहे.
या व्हिडीओत, ऐश्वर्या राय गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे, तर दीपिका पदुकोणनं लाल रंगाची साडीनेसली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे चाहते हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा प्ले करत आहेत आणि जबरदस्त लाईक आणि शेअर करत आहेत. (aishwarya rai bachchan deepika padukone throwback dance video goes viral over)
ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या बच्चनसोबत तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. फोटोमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या एकसारखे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत ऐश्वर्या म्हणाली, 'तुमच्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आणि खूप सकारात्मकतेसाठी खूप खूप धन्यवाद... खूप प्रेम, देव तुम्हाला आशीर्वाद देवो.'