मुंबई : अनेकदा आपण सोशल मीडिवर सेलिब्रिटींचे पर्सनल कागदपत्र व्हायरल झाल्याचं पाहिलं आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आणि हा फोटो आहे अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या पासपोर्टचा. या फोटोतील डिटेल पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे. कारण या पासपोर्टमध्ये अभिनेत्रीच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वार्षानु-वर्ष जुना अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित होत आहेत. कारण सरकारी कागजपत्रांवर छापले जाणारे फोटो फारसे चांगले नसतात. मात्र ऐश्वर्याच्या नॅच्यरल ब्यूटीने हा भ्रम मोडून काढला आहे. ऐश्वर्या फोटोमध्ये खूपस सुंदर आणि निरागस दिसत आहे. 


ऐश्वर्याच्या पासपोर्टचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते यावर कमेंट करत लिहीत आहेत की, दुनियाभरात हा एकमेव असा पासपोर्ट आहे ज्यावरचा फोटो खूप सुंदर आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोवर तिचे चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


अभिनेत्रीच्या या व्हायरल पासपोर्टवरील फोटोवर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर लोक खूपच प्रेम करत आहेत आणि अभिनेत्रीचे खूप कौतुक केले जात आहे. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन एक क्युट मुलगी आराध्याचे आईवडील आहेत.



अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 'ऐ दिल है मुश्किल' (Ae Dil Hai Mushkil) सिनेमाच्या यशानंतर ऐश्वर्या  Ponniyan Selvan या सिनेमात दिसली. ज्या सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेमही केलं.