Aishwarya Rai On Bollywood Vs Tollywood: 'पोनियिन सेल्वन' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मणिरत्नम दिग्दर्शित त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट फिल्म 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून ऐश्वर्या बऱ्याच कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवी असा डबल रोल असणार आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यादरम्यान ऐश्वर्याने बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड वादावर मौन सोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पोनियिन सेल्वन'शी संबंधित एका कार्यक्रमात ऐश्वर्या रायला टॉलीवूड आणि बॉलिवूड या वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ऐश्वर्या रायने आपल्या शैलीत उत्तर दिलं. ऐश्वर्या राय म्हणाली की, 'मला वाटते की ही एक चांगली वेळ आहे, सर्व अडथळे दूर होत आहेत. लोकांना सिनेमाबाबत चांगल्याप्रकारे कळत आहे. खरंतर त्यांना सिनेमाचा प्रत्येक भाग बघायचा आहे. आपण आता या सर्व वादांपेक्षा पुढचा विचार करणं गरजेचं आहे. आता सर्व बंधने तुटली आहेत. सिनेमा आणि स्टार्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.' 


Deepika Padukone Hospitalized : अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉस्पिटलमध्ये दाखल


'पोनियिन सेल्वन'मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, चियान विक्रम, जयम रवी आणि कार्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाला ए आर रहमान यांचे संगीत आहे.