वयाच्या ३६ व्या वर्षी ऐश्वर्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन
सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्ये साकारलीय पोलिसाची भूमिका
मुंबई : फिल्म अभिनेता रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबत 'सरबजीत' सिनेमात काम केलेला अभिनेता रंजन सहगल यांच निधन झालं आहे. ऑर्गन फेल झाल्यामुळे त्यांच निधन झालं आहे. पंजाबी आणि हिंदी सिनेमातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेता रंजन सहगल ओळखले जातात.
'सरबजीत' या सिनेमात रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या रायसोबत रंजन सहगल दिसले होते. ३६ वर्षांचे रंजन हे पंजाबीत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक. 'माही एनआरआय' (२०१७), आणि 'यारान दा कच्छप' (२०१४) या सिनेमांत महत्वाची भूमिका साकारली होती.
रंजन यांनी सावधान इंडिया आणि क्राइम पेट्रोल सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. पोलिसाची भूमिका साकारताना सर्वाधिक वेळा रंजन दिसले आहेत. ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच निधन झालं आहे.
अभिनेत्याने २४ फेब्रुवारी २०१४ मध्ये कॉझ्युम डिझाइनर निव्या छाबडासोबत लग्न केलं होतं. ही जोडी एका पंजाबी शोच्या सेटवर एकमेकांना भेटली होती. तसेच या दोघांनी एकत्र काम देखील केलं आहे.