बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या अभिनयासोबत सौंदर्यासाठी देखील लोकप्रिय आहे. ऐश्वर्याच्या फॅशन सेन्सची देखील जोरदार चर्चा होते. पॅरिस फॅशन विकमध्ये आपला जलवा दाखवून नुकतीच ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत भारतात परतली आहे. दोघींची या पॅरिस फॅशन विकमध्ये चांगलीच चर्चा झाली. यामुळे अतिशय आनंदी मूडमध्ये एअरपोर्टवर या दोघी स्पॉट झाल्या. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर काही प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याशी संबंधित नसून आराध्याशी निगडीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चनसाठी तिची मुलगी आराध्या किती खास आहे हे आपल्याला माहितच आहे. कोणताही मोठा इव्हेंट असो किंवा स्टारचं लग्न आराध्या ऐश्वर्यासोबत असतेच. आराध्या कायमच आई ऐश्वर्यासोबत असते. या दोघी नुकत्याच एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. दोघीबी अगदी ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसल्या. 


ऐश्वर्याचा हात पकडून आराध्या 


एअरपोर्टवरुन ऐश्वर्या आणि आराध्या बाहेर पडतात तेव्हा पॅप्स त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी दोघी अतिशय आनंदी दिसतात. पापाराझीला पोझ देताना देखील दिसतात. दरवेळीप्रमाणे आराध्याने आई ऐश्वर्याचा हात धरलेला दिसतो. यानंतर नेटिझन्सने सोशल मीडियावर प्रश्नांचा भडीमार केला. 


लोकांनी काय विचारलं प्रश्न?



अभिषेक बच्चनची मुलगी नेहमी तिच्या आईचा एक हात घट्ट पकडते आणि नंतर तिच्यासोबत चालते हे नेटिझन्सच्या अनेकदा लक्षात आले आहे. आराध्याला पुन्हा एकदा अशाप्रकारे पाहून लोक सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. 


एका युझरने लिहिले - आराध्याला चालण्यात काही त्रास होतो का, जी सतत आईचा हात धरून राहते? दुसऱ्याने लिहिले - आराध्या नेहमी अशी का चालते?  एका युझरने लिहिले - आराध्या एकटे फिरू शकत नाही का? कायम आईचा हात धरुन चालते . दुसऱ्या यूझरने लिहिले - मुलीला फक्त लाइमलाइट आवडतं वाटतं? 


त्याचबरोबर काही यूPर्स आराध्याच्या उंचीबद्दलही बोलत आहेत. एका यूझरने लिहिले- ती तिच्या आजोबांच्या उंचीपर्यंत पोहोचेल. दुसऱ्याने लिहिले - बच्चन कुटुंबाची लाडकी मोठी झाली आहे. त्याचवेळी काही यूझर्स व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिषेकबद्दल विचारत आहेत.