मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम तिच्या चर्चा रंगलेल्या असतात. सध्या ऐश्वर्याचा एक फोटो  तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्याचा  हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसेल. ऐश्वर्याच्या आयुष्यातील खास क्षणांचा फोटो रेयर फोटो क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. सध्या तिचा हा फोटो चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो ऐश्वर्याचा आहे म्हटल्यानंतर, तो फोटो नक्की कोणता असावा?  असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. आता व्हायरल होत असलेला ऐश्वयाचा फोटो तिच्या लहानपणीचा आहे. 


एका पेन्सिलची जाहिरात ऐश्वर्याने केली होती.  रेयर फोटो क्लब अभिनेत्रीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये , 'पेन्सिलसाठी मॉडलींग... ओळखी  ही अभिनेत्री कोण आहे...'



कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी, 'ती ऐश्वर्या राय असल्याचं सांगितलं आहे... ' तरी काहींनी ऐश्वर्याची तुलना तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत केली आहे. 'लहानपणी ऐश्वर्या हुबेहूब आराध्या सारखी दिसत होती...' असं युजर्स म्हणत आहेत. 


दरम्यान ऐश्वर्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं 'सेलवन'  सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  मणिरत्नम दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.