मुंबई : बी-टाऊनचं सर्वात आवडतं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... दोघांनी त्यांचं पती-पत्नीचं नातं अतिशय सुंदरपणे जपले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांचं लग्नानंतर काही वर्षात घटस्फोट झालं... पण ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं लग्नाच्या 15 वर्षांनंतरही  टिकून आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं. सोशल मीडियावर देखील दोघांबद्दल कोणती गोष्ट समोर येईल या प्रतीक्षेत चाहते असतात. आता सुद्धा ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये सर्वांसमोर सर्व काही विसरून ऐश्वर्या पती अभिषेकसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे. ऐश्वर्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील जोरदार डान्स करताना दिसत आहे. 


व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, हा व्हिडिओ ईशा अंबानीच्या लग्नाआधीच्या पार्टीचा आहे.  बी टाऊनच्या सर्व सेलिब्रिटींनी येथे हजेरी लावली. यादरम्यान ऐश्वर्या-अभिषेक, रणबीर-दीपिकाचे अनेक इनसाइड व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रणवीर सिंग-दीपिका पदुकोण हे ऐश्वर्या आणि अभिषेकचे खूप चांगले मित्र आहेत. अनेकवेळा मस्ती करताना आणि पार्टी करताना दिसतात. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.