Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!
Most Beautiful Women: नुकतीच जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी समोर आली असून या यादीत ऐश्वर्या रायचे नाव नसले तरी या यादीत एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपले स्थान निर्माण केले आहे.
Most Beautiful Women In The World: जगातील सुंदर महिलांपैकी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) हिचे नाव घेतले जाते. असे असले तरी जगातील टॉप महिलांच्या यादीत ऐश्वर्या हिचे नाव नसल्याने चर्चा होत आहे. मात्र, बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय हिची गणना जगातील सर्वात सुंदर सौंदर्यवतींमध्ये (Beautiful Women In The World) केली जाते. नुकतीच जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची (Beautiful Women) यादी जाहीर झाली, ज्यामध्ये ऐश्वर्याचे नाव कुठेही नव्हते, मात्र या यादीत आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपले स्थान पटाकवले आहे.
सर्वात सुंदर महिलांची यादी
जगभरातील टॉप 10 सर्वात सुंदर महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यापैकी एक बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) देखील आहे. अलीकडेच, विज्ञानानुसार, जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी जाहीर झाली, ज्यामध्ये हॉलीवुड एक्ट्रेस जोडी कॉमर (Jodie Comer) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. त्यांच्याशिवाय बेयॉन्से आणि किम कार्दशियन यांचेही नाव या यादीत आहे.
कोणत्या आधारावर सौंदर्य ठरवले गेले?
यूके स्थित प्लास्टिक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी नुकतीच जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी जाहीर केली आहे. डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी 'गोल्डन रेशियो ऑफ ब्युटी' या प्राचीन ग्रीक तंत्रातील नवीन संगणकीकृत मॅपिंग धोरणाचा वापर करुन विज्ञानानुसार या महिलांची यादी प्रसिद्ध केली. त्यांच्या मते जोडी कॉमर (Jodie Comer) ही जगातील सर्वात सुंदर महिला आहे. रिपोर्टनुसार, जोडी कॉमरच्या चेहऱ्यावर गोल्डन रेशोचे प्रमाण सर्वाधिक आहे.
दीपिका पदुकोणला मिळाले हे स्थान
जोडीनंतर झेंडयाला सर्वाधिक 94.37% गुणोत्तर मिळाले आहे. त्याचवेळी तिसर्या क्रमांकावर बेला हदीद (94.35%), चौथ्या स्थानावर बेयॉन्से (92.44%), पाचव्या स्थानावर एरियाना ग्रांडे (91.81%), सहाव्या स्थानावर टेलर स्विफ्ट (91.64%), सातव्या स्थानावर जॉर्डन डन (91.39%) ), आठव्या स्थानावर पण किम कार्दशियन (91.28%), दीपिका पदुकोण (91.22%) नवव्या स्थानावर आणि होयोन जंग (89.63%) दहाव्या स्थानावर आहेत. जगातील टॉप 10 सुंदर महिलांमध्ये स्थान मिळवल्यानंतर दीपिकाला सोशल मीडियावर खूप शुभेच्छा संदेश येत आहेत. दीपिका पदुकोण सर्वात सुंदर अभिनेत्री आहे यात शंका नाही.