मुंबई : 1994 साली मिस वर्ल्डचा मान पटकावणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचं चित्रपटसृष्टीत विशेष स्थान आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मनं जिंकणाऱ्या ऐश्वर्याच्या स्टारडमबद्दल सर्वांनाच माहिती आहे. ऐश्वर्याने 1997 मध्ये मणिरत्नम यांच्या 'इरूवर' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट 'और प्यार हो गया' होता. ज्यात तिने  बॉबी देओलसोबत स्क्रिन शेअर केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1999 साली प्रदर्शित झालेला 'हम दिल दे चुके सनम' हा तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर ऐश्वर्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ऐश्वर्या प्रोफेशनल लाईफमुळेही अनेकदा चर्चेत होती.अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्या बऱ्याच अभिनेत्यांसोबतच्या नावामुळे चर्चेत आली होती. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायच्या लव्ह लाईफ बद्दल सांगणार आहोत. 


राजीव मूलचंदानी
मॉडेलिंगच्या काळात ऐश्वर्याचं नाव राजीव मूलचंदानीसोबत जोडलं गेलं होतं. असं म्हटलं जातं की, जेव्हा ऐश्वर्या तिच्या करिअरची सुरुवात करत होती. तेव्हा ती राजीवला डेट करत होती. राजीव हा प्रसिद्ध मॉडेल होता. दोघांचं हे नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघंही वेगळे झाले.


हेमंत त्रिवेदी
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदी यांनीही ऐश्वर्या रायच्या आयुष्यात एंट्री केली होती. ऐश्वर्या आणि हेमंतच्या प्रेमाचे किस्सेही बरेच गाजले होते. जेव्हा ऐश्वर्याने मिस वर्ल्डवेळी जो गाऊन परिधान केला होता तो गाऊन हेमंतने ऐश्वर्यासाठी डिझाईन केला होता.  


अक्षय खन्ना
ऐश्वर्याचं नाव बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नासोबतही जोडलं गेलं आहे. दोघांनीही 'आ अब लौट चलें' आणि 'ताल' सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांच्या अफेअरची बरीच चर्चाही झाली पण हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही.


सलमान खान
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी दोघांचं अफेअर खूप चर्चेत होतं. सलमान आणि ऐश्वर्याने 1999 साली 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एकत्र काम केलं. दोघांचं अफेअर जवळपास तीन वर्षे चाललं होतं. दोघांच्या प्रेमाचे किस्से खूप चर्चेत आले होते पण हे नातं फार काळ टिकूही शकलं नाही. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे  गंभीर आरोप केले होते.


विवेक ओबेरॉय
ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयसोबतही जोडलं गेलं आहे. दोघांच्या अफेअरच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. असं म्हटलं जातं की, सलमान खानला या नात्याचा ईतका त्रास झाला की, त्याने विवेकला ऐश्वर्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. या वादानंतर विवेक आणि ऐश्वर्याचे मार्ग वेगळे झाले.


अभिषेक बच्चन
एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न केलं. 2004 मध्ये 'धूम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यात जवळीक निर्माण झाली होती आणि यानंतर दोघांनी हे नातं पुढे नेत लग्न केलं.