Aishwarya Rai Kissed Abhishek Bachchan in show : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे 2007 साली लग्न बंधनात अडकले. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत दोघेही मीडियासमोर रोमॅंटिक होताना दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ही मुलाखत भारतात नसून परदेशात आहे. या संपूर्ण मुलाखतीतील काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या आणि अभिषेक बर्‍याचदा कॅमेर्‍यासमोर अतिशय साधेपणानं दिसतात. मात्र, असा एक क्षण आला जेव्हा ऐश्वर्याचा तिच्यावरचा ताबा सुटला आणि एका प्रश्ना दरम्यान तिनं अभिषेकला तिला किस करण्यास सांगितले. खरं तर, ऐश्वर्या पहिल्यांदाच पती अभिषेकसोबत हॉलिवूडची प्रसिद्ध अँकर ओपेरा विन्फ्रेच्या प्रसिद्ध शो 'द ओप्रा विन्फ्रे शो'मध्ये पोहोचली होती. या मुलाखतीदरम्यान ओप्राने ऐश्वर्याला अनेक प्रश्न विचारले आणि यादरम्यान ऐश्वर्याला विचारले की, 'मी ऐकले की तुम्ही दोघांनी कधीही कॅमेरावर एकमेकांना किस केले नाही'. अशा वेळी ऐश्वर्यानं सुत्रसंचालकानं विचारलेल्या प्रश्नावर ऐश्वर्यानं उत्तर देण्यासाठी असं कृत्य केले होते. 



मुलाखतीदरम्यान अशी एक वेळ होती जेव्हा ऐश्वर्याला प्रश्न विचारले जात होते तेव्हा अभिषेक त्या प्रश्नांची उत्तर देताना दिसला. अभिषेक बच्चनने प्रश्नांची उत्तरं इतकी सुंदर दिली होती, की प्रत्येकालाच त्याचे एक एक शब्द आवडू लागले. ऐश्वर्याला 'ओपरा विनफ्रे' शोमध्ये विचारलं की, बॉलिवूडमध्ये तुझं चमकदार करिअर असूनही तू किसींग सीन का केले नाहीस. यावर अभिषेक बच्चन हसला आणि ऐश्वर्याच्या गालावर किस करुन म्हणाला की असे सीन वेस्टर्न सिनेमांमध्ये बर्‍याचदा खुलेआम दाखवले जातात. 


हेही वाचा : प्राजक्ता माळीनं अभिनय सोडून सुरु केलं...


आपल्या भारतात असे सीन नाही होत. अभिषेक म्हणाला की, जेव्हा आम्ही कोणतेही सीन करतो तेव्हा ते सीन तरुण मुलं मुलींना पाहतात. ते प्रेम करतात, प्रेम व्यक्त करण्यासाठी ते किस करतात.तो म्हणाला की, भारतात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एक गाणं आहे, ज्यामध्ये प्रेमाच्या सगळ्या भावना आहेत. त्यात बऱ्याच प्रेमाचे ईमोशन आहेत. पुढे अभिषेक म्हणाला की, प्रेक्षकांनाही हे सर्व पडद्यावर दाखवण्याची गरज वाटत नाही. असं मला वाटतं''.