Aishwarya Rai left Bachchan's house : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंब ही एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यांचं चर्चेत राहण्याचं कारण हे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनचं वैवाहिक आयुष्य आहे. त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु असल्याचं म्हटलं जातं होतं. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील वाद वाढत आहे. तर असेही म्हटले जात आहे की ते दोघे लवकरच विभक्त होण्याचा निर्णय घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबातील काही सदस्यांनी सांगितलं आहे की ऐश्वर्या आणि अभिषेक लेक आराध्यामुळे एकत्र होते. नाही तर अनेक वर्षांपूर्वीच त्यांच्यातील नात बिघडलं आहे. पण आता त्यांच्या हातातून सगळ्या गोष्टी या हळू हळू सूट लागल्या आहेत. इतकंच नाही तर लवकरच ते काही मोठा निर्णय घेऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झूम'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात दुरावा येऊ लागला आहे. दोघं फक्त आणि फक्त लेकीमुळे एकत्र होते. पण आता सगळ्या गोष्टी इतक्या बिघडल्या आहेत की त्या दोघांचं खासगी आयुष्य हे देखील मीडियात चर्चेचेत आहे. इतकंच नाही तर रिपोर्ट्समध्ये हे देखील म्हटलं आहे की ऐश्वर्या रायनं बच्चन कुटुंबाच्या घरापासून देखील अंतर करून घेतलं आहे. ती आता तिच्या आईसोबत राहते. खरंतर, आतापर्यंत याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  




हेही वाचा : 'तुला दिग्दर्शकासह थोडी तडजोड...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव


दरम्यान, अशा देखील चर्चा आहेत की ऐश्वर्या आणि तिची सासू जया बच्चन या दोघांनी त्यांच्यातील बोलणं कधीच थांबवलं. गेल्या अनेक वर्षांपासून त्या एकमेकांशी बोलत नाहीत. इतकंच नाही तर त्यांना एकाच ठिकाणी एकत्र राहायला देखील आवडत नाही. तर अभिषेक बच्चन या सासु-सुनेच्या भांडण्यात मध्येच अडकला आहे. याशिवाय असे म्हटले जाते अभिषेकनं भांडणांमध्ये नेहमीच त्याच्या आई-वडिलांना साथ दिली आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये अनेकदा भांडण झालं. तर श्वेता बच्चन जलसामध्ये रहायला लागल्यामुळे ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्या वाद वाढल्याचे देखील म्हटले जाते. घटस्फोटाविषयी बोलायचे झाले भविष्यात त्यांचा घटस्फोट होईल याची शक्यता फार कमी आहे. त्याच कारण म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाल्याच त्या दोघांच्या चाहत्यांना ही गोष्ट आवडणार नाही. नक्की या सगळ्यात काय सत्य आणि काय असत्य हे अद्याप समोर आलेले नाही.