मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्व सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही 'पोन्नियन सेल्वन' या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ऐश्वर्या पुनरागमन करत आहे. ती रॉयल लेडी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक समोर आला आहे. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमावेळी ऐश्वर्या देखील चेन्नईमध्ये उपस्थित होती. ऐश्वर्याचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 


आणखी वाचा : Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमातील ऐश्वर्याचे फोटो तिच्या फॅन अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. यावेळी ऐश्वर्याचनं काळ्या रंगाटा ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 


आणखी वाचा : Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक



ऐश्वर्याचे हे फोटो पाहून तिनं बोटॉक्स केल्याचं नेटकरी म्हणत आहेत. इतकंच काय तर ऐश्वर्यानं बोटॉक्स करत चूक केली आहे. तिचा चेहरा बदलला आहे, असे काही नेटकरी म्हणत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'बोटॉक्स थोडं जास्त झालंय.' दुसरा नेटकरी म्हणाला,'प्लास्टिक जास्त झालंय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्यानं गालावर काहीतरी केलं आहे'. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकची स्तुती केली आहे.  (aishwarya rai troll for her look at upcoming movie ponniyin selvan trailer launch event )


आणखी वाचा : कोण होणार कतरिनाची वहिनी? Koffee With Karan 7 मध्ये नाव समोर



आणखी वाचा : Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!
ऐश्वर्याचा 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं आहे. तसेच हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.