Aishwarya Rai with Abhishek and Amitabh Bachchan : बच्चन कुटुंबात तणाव असल्याच्या चर्चांमध्ये, ऐश्वर्या राय ही सासरे अमिताभ बच्चन, लेक आराध्या बच्चन आणि पती अभिषेक बच्चनसोबत झाली स्पॉट. बच्चन कुटुंबाच्या जयपुर पिंक पॅंथरला पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती ऐश्वर्या. काल म्हणजेच शनिवारी रात्री हे सगळे मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल इंडोर स्टेडियममध्ये पोहोचली होती. प्रो कबड्डी लीगचा आनंद घेण्यासाठी ते तिथे पोहोचले होते. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बच्चन कुटुंबाचा हा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सनं त्यांच्या ट्विटर म्हणजेच X अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्याच्या एका बाजुला आराध्या आणि दुसऱ्या बाजुला बिग बी बसल्याचे दिसत आहे. तर मॅच सुरु असताना ऐश्वर्या किती जोशात जयपुर पिंक पॅंथर्सला पाठिंबा देत आहे ते पाहायला मिळत आहे. तर आराध्याची नवी हेअर स्टाईल पाहायला मिळाली आहे. जयपुर पिंक पॅंथर्सचा विजयाचा आनंद घेताना ऐश्वर्या दिसली. काल झालेल्या मॅचमध्ये यू मुंबानं 31 पॉइंट्स केले तर जयपुर पिंक पॅंथर्सनं 41 पॉइंट केले. 


अभिषेक बच्चन हा बंची वालियासोत जयपुर पिंर पॅंथर्सचा सह-मालक आहे. टीमनं 2014 मध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. राज शमानीसोबतच्या पॉडकास्टमध्ये अभिषेकनं टीममध्ये इन्व्हेस्ट करण्याविषयी वक्तव्य केलं होतं. त्याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला होता की 'आम्हाला काहीच माहित नव्हतं, एक टीम कशी बनवायला हवी. त्याशिवाय एका टीमला नेहमी एकत्र कसं ठेवायचं. टीमला सगळ्या सुविधा देण्यासाठी किती पैसे लागतात, काहीच माहित नव्हतं. हे खरंच अंधारात बाण मारण्यासारखं होतं.' 


हेही वाचा : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप; लव लाइफमुळे चर्चेत होती 'ही' अभिनेत्री


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात तणाव असल्याचे म्हटले जात होते. एका कार्यक्रमात जेव्हा अभिषेकच्या हातात त्याच्या लग्नाची अंगठी पाहिली नाही. तेव्हा सोशल मीडियावर ही चर्चा सुरु झाली होती की त्यांचा घटस्फोट होणार आहे. इतकंच नाही तर काहींनी हे देखील सांगितलं की ऐश्वर्यानं तिचं सासरं सोडलं असून आईसोबत राहते. पण मुलीच्या वार्षिक स्नेह संमेलनात ऐश्वर्या, अभिषेक, अमिताभ आणि अगस्त्य नंदा देखील होते.