मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला धक्का बसला. ऐश्वर्याने चक्क मुंडन केल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

​ऐश्वर्याने का केले मुंडण? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. या फोटोत ऐशने अंगावर भगवे उपरणे, माथ्यावर टिळा आणि केसांचे टक्कल केल्याचे दिसत आहे. हाच फोटो काही दिवसांपासून  फोटो व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर याची चर्चा आहे. ती म्हणे तिरुपतीला गेली आणि तिने केस प्रसिद्ध तिरुमला मंदिरात दान केलेत. तसेच व्हायरल होणाऱ्या फोटोखाली तसे नमूद करण्यात आलेय. 


मात्र, ऐश तिरुपतीला गेली की नाही, याची खातरजमा होत नाही. त्यामुळे या फोटो मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता याचा उलगडा झाला. असा फोटो करण्यासाठी फोटोशॉपची मदत घेतल्याचे दिसत आहे. ऐश्वर्याचा जुना फोटो मॉर्फ करून तो व्हायरल केला जात आहे. कोणीतरी हा खोडसालपणा केल्याचे दिसत आहे.


पाहा हा फोटो