ठाणे : काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त 'मिड-डे मील' कार्यक्रमांतर्गत १००० मुलांच्या जेवणाचा खर्च करणार आहे. अन्नमित्र फाऊंडेशनतर्फे मिड-डे मील हा कार्यक्रम चालवला जातो. या फाऊंडेशनची स्थापना अन्नमित्र फाऊंडेशन इंटरनेशनल सोसाईटी आॅफ कृष्णा कांनशसनेसतर्फे करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्कॉनचे आध्यात्मिक गुरू राधानाथ स्वामी महाराज यांनी सांगितले के, "अन्नमित्रतर्फे चालवण्यात येणारी  'मिड-डे मील' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २००० हून अधिक विद्यालयात पौष्टिक मिड डे भोजन दिले जाते."


त्याचबरोबर ते म्हणाले की, "ही योजना २००४ पासून सुरु झाली आहे. मात्र तेव्हा याचे स्वरूप अत्यंत लहान होते. त्यामध्ये केवळ ९०० लोकांना जेवण मिळत होते. आता याचे स्वरूप विस्तारले असून देशातील ७ राज्यातील १० लाखाहून अधिक मुलांना याचा लाभ मिळतो."