मुंबई : 'बिग बॉस 17' ची ऐश्वर्या शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वृत्तानुसार, ऐश्वर्या तिचा कॉलेज मित्र राहुल पंड्यासोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, राहुल आणि ऐश्वर्या सात वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. 'बिग बॉस 17' ची ऐश्वर्या शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका मीडिया पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या तिचा कॉलेज मित्र राहुल पंड्यासोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, राहुल आणि ऐश्वर्या सात वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते.
 
'पिंकविला'शी संवाद साधताना राहुल पंड्या म्हणाला, 'जेव्हापासून हे आर्टिकल समोर आलं आहे, तेव्हापासून माझी मानसिकस्थिती चांगली नाही आहे.  सोशल मीडियावर युजर्स माझा खूप तिरस्कार करत आहेत. सध्या माझी काही बोलण्याची मानसिक स्थिती नाही. मला खूप वाईट वाटत आहे. तो पुढे म्हणाला, 'प्रत्येकाला त्या महिलेबद्दल सहानुभूती आहे आणि जेव्हा असं काही घडते तेव्हा समोरच्या पुरुषाला काय त्रास होतो हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टेलीचक्कर' शी केलेल्या संभाषणात राहुलने खुलासा केला की, ऐश्वर्या शर्मा जेव्हा डान्स इंडिया डान्स ऑडिशनसाठी आली होती तेव्हा तो त्याला भेटली होती, ज्यामध्ये तो कोरिओग्राफर होता. ते दोघंही एकाच  कॉलेजमध्ये असल्याचंही त्यांने सांगितलं. राहुल पुढे म्हणाला की, ऐश्वर्याचे वडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होते आणि त्यांना वेगळं करण्यासाठी त्यांनी तिला बँकिंग करण्यासाठी पुण्याला पाठवलं होतं. मात्र तरिही राहुल आणि ऐश्वर्या पुण्यात भेटत राहिले.



ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची प्रेमकहाणी
यानंतर ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट 'गम है किसी के प्यार में'च्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले. 30 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांचं लग्न झालं. हे जोडपं सध्या 'बिग बॉस 17' मध्ये दिसत आहे आणि त्यांना शोमध्ये समजणं कठीण जात आहे. पहिल्या आठवड्यात ऐश्वर्या आणि नीलला डेटवर पाठवलं होतं, जेणेकरून ते मोकळेपणाने बोलू शकतील आणि गोष्टी समजू शकतील. ऐश्वर्या आणि नील हे दोघंही या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत.