ऐश्वर्या रायने केले परदेशात ध्वजवंदन, पहिली भारतीय अभिनेत्री
देशाला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मेलबर्नमध्ये एक खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने ध्वजवंदन केले.
मेलबर्न : देशाला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मेलबर्नमध्ये एक खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने ध्वजवंदन केले.
फेडरेशन स्क्वेअर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परदेशात तिरंगा फडकवण्याचा मान मिळणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. तिच्यासोबत आराध्याही सहभागी झाली होती.
मेलबर्नकर तुमची मी खूप आभारी आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच तो अभिमानाचा आहे. हा क्षण मी आयुष्यभर आठवणीत ठेवेन, असे उद्गार ऐश्वर्या हीने यावेळी काढले.