मुंबई : 'प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचा मोलाचा वाटा असतो..' असं आपणं अनेकदा ऐकलं असेल. प्रत्येक पुरूषामागे एक महिला खंबीरपणे उभी असते. अभिनेता अभिषेक बच्चनच्या आयुष्यातील ती स्त्री म्हणजे त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. याबद्दल खुद्द अभिषेकने खुलासा केला आहे. अभिषेकला यशाचं ध्येय गाठण्यासाठी ऐश्वर्याने फार मदत केली. त्यासाठी  अभिषेकने ऐश्वर्याचे आभार देखील मानले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक बच्चनच्या मते त्याच्या यशामागे त्याची पत्नी ऐश्वर्याचा मोलाचा वाटा आहे. अभिषेकने सांगितले की, लॉकडाऊनच्या वेळी ऐश्वर्याने आपल्याकडे किती गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटू शकते. अशा अनेक गोष्टींचा खुलासा अभिषेकने केला. त्यामुळे अभिषेक सध्या चर्चेत आला आहे. 


अभिषेक म्हणाला, 'मला कायम लॉकडाऊनमध्ये काय केलं असा प्रश्न विचारला जातो. लॉकडाऊनमध्ये काही लोक जेवण बनवायला शिकली. काही जण नवी भाषा शिकले. याचबद्दल मी माझ्या पत्नीसोबत बोलत होतो आणि तेव्हा  एक पत्नी जे करते तेच  ऐश्वर्याने केलं. तिने मला मार्ग दाखवला. ऐश्वर्या मला म्हणाली, पहिल्यांदा तुला कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी संधी मिळाली आहे.' 


पुढे अभिषेक म्हणाला, 'ऐश्वर्याचं बोलणं मला आणि तिला देखील पटलं. लॉकडाऊनच्या काळात कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली.' सांगायचं झालं तर लॉकडाऊननंतर  त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. नुकताच प्रगर्शिच झालेल्या 'बिग बुल' चित्रपटात त्याने हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. अभिषेकचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.