मुंबईः अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण सध्या भलतीच चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर चांगली अॅक्टिव असते त्यामुळे तिचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. त्यातून नुकतेच न्यासा देवगणचे ग्रीसमधील व्हेकेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीसमधील एका पार्टीत न्यासाचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तिने निळ्या रंगाचा वनपीस घातला होता. ती आपल्या मित्रांसमवेत ही डान्स पार्टी एन्जॉय करताना दिसते आहे. न्यासाच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर ट्रोलर्सनी मात्र न्यासाला ट्रोल केले आहे. 


काहींनी तिला फार वाईट पद्धतीने ट्रोल केले आहे तर काहींनी तिची बाजूही घेतली आहे. ही मुलगी बापाच्या पैशांवर मजा मारते आहे, अशी टीका काही ट्रोलर्सनी केली आहे तर काहींनी असे सांगितले आहे की, तिच्या वडिलांनी मेहनती पैसे कमावले असून त्यांची मुलगी म्हणून ती त्यांच्या पैशांवर मजा मारते आहे तर त्यात गैर काय? 


न्यासा यापुर्वी अशा अनेक पार्ट्यांमध्ये दिसली आहे. तिला तिच्या मित्रमैत्रींणीबरोबर वेळ घालवायला आवडतो. न्यासाने सिंगापूरमधून तिचे शिक्षण पुर्ण केले आहे. न्यासा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या बॉलीवूड डेब्यूची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अजय देवगण यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीतून न्यासा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु त्यावर अजयने मात्र फारसा खुलासा न करता अद्याप मौन पाळले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


न्यासाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून त्यापैंकी काही कमेंट्स या तिला सल्ला देणाऱ्याही ठरल्या. एका युझरने सांगितले आहे की वडिलांच्या पैशांवर आनंद लुटण्यापेक्षा तिने आपल्या करिअरवर भर द्यावा.