‘आरआरआर` सिनेमात अजय - आलियाची वर्णी
सिनेमाच्या फॅशबॅक सिक्वेंसमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
मुंबई: दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील दर्जेदार कलाकार आहेत. दिग्दर्शक एस. एस. राजमौली सध्या त्यांच्या ‘आरआरआर' सिनेमामध्ये व्यग्र आहेत. सिनेमा दिग्दर्शकांनी सिनेमाच्या प्रति असलेली चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. दिग्दर्शक एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर' सिनेमात तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे सिनेमाच्या फॅशबॅक सिक्वेंसमध्ये अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
त्याबरोबर सिनेमात आलिया सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात आलिया सीता नावाची व्यक्तिरेखा साकरताना दिसणार आहे. त्याचबरोबर सिनेमा अनेक भाषांमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक भाषांसाठी सिनेमाला वेगळे शिर्षक देण्यात येणार आहे. त्यासाठी दिग्दर्शकांनी समिक्षकांडे सिनेमासाठी शिर्षक सूचवण्याची विनंती केली. 'आरआरआर' सिनेमाची कथा अल्लूरी सीतारामाराजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेली आहे.
ज्युनिअर एनटीआर सिनेमात कोमाराम भीम यांची भूमिका साकारणार असून राम चरण सिनेमात अल्लूरी सीतारामाराजू यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.‘आरआरआर' सिनेमासाठी एनटीआर आणि राम चरण विशेष मेहनत घेत आहेत. सिमेमाच्या चित्रीकरणासाठी एक वेगळे गाव साकारण्यात येणार आहे. 1920 हा साल लक्षात घेवून या गावाची रुपरेषा साकारण्यात येणार आहे. सिनेमाचे बजेट 300 कोटींचे आहे.