8 वर्षांनंतर पुन्हा काजोल पुन्हा होणार `सिंगल मदर`
लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर काजोल पुन्हा हिंदी सिनेसृसष्टीकडे परतली. यापूर्वी काजोलने धनुषसोबत `वीआयपी2` या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा काजोल तिच्या फॅन्ससाठी खुषखबर घेऊन आली आहे. काजोल लवकरच हिंदी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
मुंबई : लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर काजोल पुन्हा हिंदी सिनेसृसष्टीकडे परतली. यापूर्वी काजोलने धनुषसोबत 'वीआयपी2' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा काजोल तिच्या फॅन्ससाठी खुषखबर घेऊन आली आहे. काजोल लवकरच हिंदी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
अजय देवगणचं प्रोडक्शन
अजय देवगण प्रोडक्शनखाली काजोलच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. 'इला' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार आहेत. काजोल पुन्हा रुपेरी पडद्यावर 'सिंगल मदर'च्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्विटरच्या माध्यमातून काजोलने मेकअपच्या वेळचा खास क्षण शेअर केला आहे.
चित्रपटाची कहाणी काय ?
या चित्रपटाची कहाणी आई आणि मुलामधील संबंधांवर बेतलेली आहे. काळजाचा ठाव घेणार्या या चित्रपटाच्या डायलॉग्सवर दिग्दर्शक प्रदीप सरकार काम करत आहेत. यापूर्वी प्रदीप सरकार यांनी 'परिणीता' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
काजोल हीच परफेक्ट निवड
प्रदीप सरकार यांनी काजोलची निवड अचूक असल्याचे सांगितले आहे. काजोलचे सौंदर्य आणि अॅक्टिंगचे कौतुकही त्यांनी केले होते. काजोलने यापूर्वी 2010 साली 'वी आर फॅमिली' या चित्रपटामध्ये सिंगल मदरची भूमिका साकारली होती.