मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे तर चर्चेत असतातचं, पण अधिक चर्चा रंगते ती म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल... अभिनेत्री रवीना टंडन देखील रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत आली. एक काळ असा होता जेव्हा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण सोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा झाल्याचं देखील समोर आलं. पण अभिनेत्री करिष्मा कपूरच्या एन्ट्रीनंतर अजय आणि रवीनाच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अजयच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर रवीनाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एका मुलाखतीत रवीनाने अजयसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. एवढंच नाही तर,त्यावेळी रवीनाने अजयवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. रवीनाने अजयसोबतचे वैयक्तिक फोटो आणि त्याने लिहिलेले पत्र देखील सर्वांसमोर सादर केले. तेव्हा दोघे प्रचंड चर्चेत आले.


रवीनाच्या आरोपांनंतर अजय प्रचंड भडकला होता. यावर एका मुलाखातीत अजयनने मैन सोडलं. रवीनाचं वक्तव्य म्हणजे फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचं अजयने सांगितलं. 


पुढे अजय म्हणाला, 'रवीना एक ड्रामेबाज आहे. ती जन्मजात खोटी आहे. तिला मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे.' पण आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण मागे घडलेल्या घटना कायम चाहत्यांमध्ये चर्चेत राहिल्या.