Ajay Devgan Son Latest Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अजय देवगणच्या मुलाची. सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अजय देवगण यानं आपल्या लेकासह एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे त्या दोघांची बरीच चर्चा ही रंगलेली होती. युग देवगणला पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी युगला 'यंग सिंघम' किंवा 'सिंघम रिटर्न्स' असंही म्हटलं आहे. निसा देवगण हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. तिचे अनेक फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्याचसोबत पार्टीमधले आणि सुट्ट्यांमधले तिचे फोटो हे अनेकदा व्हायरल होत असतात. परंतु आता चर्चा आहे ती म्हणजे अजय देवगणच्या मुलाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या त्याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. मध्यंतरी त्याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यावेळीही युगची जोरात चर्चा पाहायला मिळाली होती. आताही त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अजय देवगणला या इंडस्ट्रीत 30 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्याचे आतापर्यंत अनेक चित्रपट गाजले आहेत. अनेक चित्रपटांतून त्यानं उत्तमोत्तम भुमिका केल्या आहेत. त्याचा आजही तितकाच मोठा चाहतावर्ग आहे. सिंघम म्हणून त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. आता लवकरच सिंघम रिटर्न्स हा रोहित शेट्टीचा मोठा आणि बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा आहे. या चित्रपटातून अनेक मोठमोठे आणि दिग्गज कलाकारही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 


हेही वाचा : बॉबी देओलच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? लाईमलाईटपासून राहते दूर 


न्यासा देवगण ही बऱ्यापैंकी लाईमलाईटमध्ये आहे. परंतु युग देवगण हा फारसा लाईमलाईटमध्ये नाही. परंतु त्याची अनेकदा चर्चा असते. काही दिवसांपुर्वी तो नवरात्रीला आपल्या आईसह काजोल देवगणसह दिसला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होती. अजय देवगणनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ते एका चॅरिटेबल ट्रस्टच्या इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी त्याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी कमेंट्समधून युगचं आणि अजय देवगणचं कौतुक केलं आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. अनेकांनी 'लिटिल सिंघम' आणि 'नवा सिंघम' अशा कमेंट्स केल्या आहेत. यावेळी अनेकांनी किती गोड मुलगा आणि वडिलांची जोडी ही खूपच चांगली आहे.