मुंबई : काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. न्यासाचे नवीन फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. काजोल आणि अजयची मुलगी असल्याने लोकं न्यासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. न्यासाचे काहीॉ फोटो इंटरनेटवर समोर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, काजोलची मुलगी न्यासा देवगणचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये न्यासा आरशासमोर उभी राहून सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोत न्यासासोबत त्याची बेस्ट फ्रेंड देखील आहे. फोटोमध्ये न्यासाने डोक्यात क्राउन घातलं आहे. पण फोटोमध्ये न्यासाच्या कपाळातून वाहत असलेल्या रक्ताने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 



दरम्यान काही दिवसांपूर्वी, न्यासाचे मित्रांसोबत काही फोटो व्हायरल झाले होते. मित्रांसोबत न्यासाचे फोटो पाहिल्यानंतर अजय आणि काजोलच्या काही चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे, तर दुसरीकडे काही मात्र संताप व्यक्त करत आहेत. फोटोमध्ये न्यासा मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे



न्यासा बॉलिवूडमध्ये कधी करणार पदार्पण ?
अजय देवगणने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'मला माहित नाही की तिला या लाईनमध्ये यायचं आहे की नाही. आतापर्यंत तिने कोणताही इंट्रेस्ट दाखवला नाही, मात्र मुलांसोबत कधीही काहीही बदलू शकतं. सध्या ती बाहेर राहून अभ्यास करत आहे.