Ajay Devgn Duplicate : बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण (Ajay Devgn). अजय देवगणला टक्कर देण्यासाठी त्याच्या सारखा कोणताही अभिनेता आला नाही. पण सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा मुलगा हुबेहुब कॉपी आहे. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणच्या या ड्युप्लिकेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जी व्यक्ती आहे, त्याच्या हेअरस्टाईलपासून कपड्यांपर्यंत सगळंच अजय देवगणसारखं दिसत आहे. अजयच्या ड्युप्लिकेटचा हा व्हिडीओ पाहून काजोललाही (Kajol) धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगणसाारखा दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव कैलाश चौहान आहे. कैलाश हा अजय सारखीच स्टाइल करताना दिसत आहे. कैलाशनं अजय देवगणच्या हेअर स्टाइलपासून त्यापासून त्याची स्टाईल कॉपी केली आहे. कैलाश अजयच्या 90 च्या दशकातील लूकमध्ये दिसत आहे. (Ajay Devgn Duplicate)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अजय देवगणच्या या ड्युप्लिकेटचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अजय देवगण आणि त्याचा ड्युप्लिकेट इतका साम्य दिसतो की काजोललाही धक्का बसेल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितचा ड्युप्लिकेट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला  व्हायरल झाला होता. दरम्यान, अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर अनेक रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी अजयची एकूण संपत्ती किती आहे अशा अनेक गोष्टी सर्च केल्या. 


अजय देवगणची एकूण संपत्ती 


अजय चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधून कमाई करतो. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 2 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. तर एका चित्रपटासाठी अजय 30-50 कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. फक्त मुख्य भूमिकेसोबतच कॅमिओ भूमिकेसाठीही मोठी रक्कम मानधन म्हणून घेतो. 'गंगूबाई काठियावाडी'मधील छोट्या भूमिकेसाठी अजयनं 11 कोटी रुपये आणि 'आरआरआर'साठी 25 कोटी रुपये आकारले. (Ajay Devgn Net Worth)


हेही वाचा : 35 व्या वर्षी अभिनेत्रीचे 10 वं लग्न? कधी लग्नाच्या काही दिवस आधी मोडला होता साखरपुडा


अजय मुंबईतील जुहू या परिसरात 30 कोटी रुपयांचा 'शिवशक्ती' नावाचा आलिशान बंगला आहे. यामध्ये तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. बंगल्यात जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर आणि लायब्ररी देखील आहे. याशिवाय लंडनच्या पार्क लेनमध्ये त्यांचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 54 कोटी रुपये आहे. 2010 मध्ये अजयने 6 सीटर प्रायव्हेट जेट 'हॉकर 800' खरेदी केलं होतं. त्याची किंमत 84 कोटी रुपये आहे. 


अजयला महागड्या आलिशान वाहनांची खूप आवड आहे. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शमध्ये टोयोटा सेलिका, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, फेरारी आणि Maserati Quattroporte यांचा समावेश आहे. Maserati Quattroporte चे मालक असलेले तो पहिला भारतीय आहे. त्याच्या सर्व गाड्यांची एकूण किंमत 15 कोटी रुपये आहे. अजयनं जवळपास 100 कोटींची गुंतवणूकही केली आहे. 5 वर्षांपासून त्यांची एकूण संपत्ती वार्षिक 20% ने वाढत आहे