Singham Again : रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगन, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण हे चित्रपटामध्ये दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. अजय देवगनचा हा चित्रपट दिवाळीमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, 'सिंघेम अगेन' प्रदर्शित होण्याआधी रोहित शेट्टीने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. 2011 मध्ये आलेला अजय देवगणचा 'सिंघम' हा चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात तुम्हाला पुन्हा एकदा पाहता येणार आहे.


'सिंघेम अगेन' आधी रोहित शेट्टीची मोठी घोषणा


'सिंघेम अगेन' चित्रपटाआधी रोहित शेट्टीने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. नुकताच 'सिंघेम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अशातच आता रोहित शेट्टीने 2011 मध्ये प्रदर्शित झालेला 'सिंघम' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्यची घोषणा केली आहे. अजय देवगनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. त्यामुळेच आता 2011 मध्ये आलेला 'सिंघम' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या दिवशी प्रदर्शित होणार 'सिंघम अगेन'


रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटाची सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार आहेत. ज्यामध्ये अजय देवगन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी रोहित शेट्टीने चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करून मोठं सरप्राईज दिलं आहे. 


2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिंघम' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. या चित्रपटाने 141 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.