Ajith Kumar In KGF 3 : दाक्षिणात्य 'रॉकिंग स्टार' अर्थात यशच्या KGF 3 या कार्यक्रमाची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. दिग्दर्शक प्रशांत नीलच्या या चित्रपटासंबंधीत एक बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जातय की या फ्रेंचायझीमध्ये आता अजित कुमारची एन्ट्री होणार आहे. याचा अर्थ या चित्रपटाच्या पटकथेत नक्कीच काही तरी वेगळं पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की गरुडा आणि अधीरानंतर आता अजित खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे यशचा एका नवा लूक व्हायरल होत आहे. त्याचा हा लूक 'टॉक्सिक' फिल्मचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित कुमारनं नुकत्याच दिग्दर्शक प्रशांत नील यांची भेट घेतली. असं म्हटलं जातं की ते दोघं या चित्रपटासाठी काम करण्याची शक्यता आहे. डीटी नेक्स्टच्या रिपोर्टनुसार, पहिला चित्रपट हा एक स्टॅंड अलोन चित्रपट असू शकतो, तर दुसरीकडे यशचा 'केजीएफ' च्या चित्रपटा संबंधीत असू शकतो. खरंतर, या प्रोजेक्ट्सच्या सुरु होण्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागेल. या दोन्ही चित्रपटांना सुरु होण्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागेल. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती होम्बले फिल्म्सच्या विजय किरागंदूर करू शकतात. 


अजित कुमार सध्या मगिज थिरुमेनी यांच्या दिग्दर्शनात बनत असलेला चित्रपट 'विदा मुयार्ची' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. 'विदा मुयार्ची' नंतर अजित हा चित्रपट निर्माता आदिक रविचंद्रन यांच्या 'गुड बॅड अग्ली' या चित्रपटाची शूटिंग सुरु करु शकतात. प्रशांत नीलशी अजित यांची भेट तेव्हा झाली जेव्हा ते 'विदा मुयार्ची' च्या शूटिंगमधून घेतलेल्या ब्रेकमध्ये होते. असं म्हटलं जातं की प्रशांत यांनी अजित यांच्याकडून तीन वर्षांचा वेळ मागितला होता. 


हेही वाचा : 'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट


रिपोर्ट्समध्ये पुढे असे म्हटले आहे की ते आधी एके 64 साठी काम करु शकतात. हा एक स्टॅंडअलोन प्रोजेक्ट असणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये फ्लोअरवर येईल आणि 2026 मध्ये प्रदर्शित होईल. त्याचा दुसरा प्रोजेक्ट हा 'केजीएफ 3' असेल. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या क्लायमॅक्सनं 'केजीएफ 3' ची आशा प्रेक्षकांना दिली आणि अशात आता अजितची भूमिका प्रशांत नील हे सिनेमॅटिक यूनिव्हर्समध्ये सगळ्यात मोठं असेल असं म्हणतात. दरम्यान, दुसऱ्या भागाच्या शेवटी रवीना टंडननं रामिका सेन आणि संजय दत्त यांनी अधीरा ही भूमिका साकारली होती. या सीक्वलमध्ये खलनायक अधीरा असणार आहे. आता म्हटलं जातं की तिसऱ्या भागात अजित कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.