नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या आपल्या 'पॅडमॅन' या सिनेमाच्या प्रमोशनात बिझी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच दरम्यान सोमवारी अक्षय दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका महाविद्यालयात दाखल झाला होता. इथं एक महिला मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. अक्षयनंही या मॅरेथॉनचं कौतुक केलं. 


यानंतर त्यानं आपल्या ट्विटर हन्डलवर एक फोटो शेअर केला. या फोटोत अक्षयनं आपल्या हातात भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या 'एबीव्हीपी'चा झेंडा हातात घेतलेला आहे. 'या महिला महिला सशक्तीकरणाला पुढे नेतायत, सोबतच टॅक्स फ्री सॅनिटरी पॅडसाठी धावत आहेत' असं कॅप्शन त्यानं या फोटोला दिलंय.


अक्षयनं हे ट्विट केल्यानंतर लगेचच सोशल मीडियावरून त्याला अनेकांनी ट्रोल करायला सुरूवात केली. काहींनी त्याला राजकारणापासून दूर राहण्याचा सल्लाही दिलाय. 
 







अक्षयचा 'पॅडमॅन' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत'चा वाद सुरू असताना अक्षयनं आपल्या सिनेमाचा प्रदर्शन तारीख पुढे ढकललीय. हा सिनेमा आता ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.