मुंबई : अभिनेत्री अक्षरा हासन ही ताला अजित यांच्या आगामी सिनेमा विवेगममध्ये व्यस्त आहे. ती या सिनेमातून तमिळ फिल्म जगतात मोठ्या पडद्यावर पाऊल टाकत आहे. मात्र, असे असले तरी ती सोशल मीडियावर तिची वेगळीच चर्चा रंगत आहे. ही चर्चा आगामी सिनेमाबाबत नाही तर तिने  बदललेल्या धर्मावर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ही अफवा असेल असे म्हटले जात आहे. याबाबत अनेकांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केली आहे. अक्षराचे वडील कमल हासन यानेही आपल्या धाकट्या मुलीच्या धर्म बदलाबाबत पसरणाऱ्या अफवांबाबत एक मजेशीर उत्तर दिलेय.


कमल हसनने एक ट्विट केलेय.




अक्षराने आपल्या उत्तरात म्हटले आहे, हाय बापूजी. नाही. मी आजही नास्तिक आहे. सध्या बौद्धधर्मानुसार मी जीवन जगत आहे आणि व्यक्तिगत मार्गावर विश्वास ठेवते.