मुंबई : भोजपुरी क्वीन अक्षरा सिंग सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. नुकतीच ही अभिनेत्री आमिर खानसोबत एका शोमध्ये दिसली. अक्षरा सिंहने येथे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं लॉन्च करताना आमिरने सोशल मीडिया स्टार्सची भेट घेतली. यादरम्यान अक्षरा सिंहही आमिरसोबत दिसली. आमिरने अक्षरा सिंहला त्याच्या वैयक्तिक आणि लव्ह लाईफबद्दल विचारलं.


या भेटीत आमिर खानने अक्षराला तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि फसवणूकीबद्दल प्रश्न विचारला. यावर भोजपुरी अभिनेत्री सांगितलं की, तिचं पहिलं प्रेम लहानपणीच होतं आणि ते खूप क्यूट होतं. अक्षरा सिंह पुढे म्हणाली, 'जेव्हा मी मोठेपणी प्रेमात पडले, ते खूप वेदनादायक होतं.


तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना अक्षरा सिंह म्हणाली की, तिचं शेवटचं रिलेशनशिप खूप वाईट होतं. यावर बोलताना ती म्हणाली, 'मला त्या दिवसातून परत जायचं नाही. दुसऱ्या रिलेशनशिपच्या सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. सगळं काही सुंदर होतं. पण त्या दिवसांतून मी खूप काही शिकले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अक्षरा सिंह भोजपुरी पॉवर स्टार पवन सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या रिलेशनचा शेवट खूप वाईट झाला. अक्षराने पवन सिंगवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र, आता अभिनेत्री तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली आहे. त्याचबरोबर पवन सिंग त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेणार आहे.