Akshay Kumar Advice to Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मिया छोटे मिया' या आगामी चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित झाला. याच ट्रेलरच्या लॉन्चच्या वेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. त्यावेळी अक्षय आणि टायगरमधील ब्रोमॅन्स सगळ्यांनाच पाहायला मिळाला. पण या सगळ्यात अक्षयनं टायगर श्रॉफला जो सल्ला दिला त्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच प्रेक्षक हसू लागले आणि त्यानंतर अक्षयनं टायगरला मिठी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय आणि टायगरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतंय की अक्षयला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचे लक्ष वेधले. या वेळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला विचारण्यात आलं की ते दोघं एकमेकांना काय सल्ला देतील? यावर उत्तर देत टायगर म्हणाला, मी कोणताही सल्ला देण्याजोगा नाही. खिलाडी असण्यावर मला काही चुकिचं किंवा काही कमी दिसत नाही. ते या वयात आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा देतात. तर अक्षयचं उत्तर ऐकताच सगळ्यांना हसू अनावर झालं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अक्षय कुमारनं म्हटलं की मला टायगरला फक्त इतकंच सांगायचं आहे की एकाच दिशेला 'दिशा' रहा. अक्षयनं हा सल्ला फार सिरियस होऊन दिला. तर तिथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागले. त्यानंतर अक्षयशिवाय सगळेच स्टारकास्ट हसू लागले. तर चित्रपटाचा निर्माता जॅकी भगनानी टायगरला मिठी मारण्यासाठी पुढे आला. त्यानंतर अक्षय हसत हसत आला आणि त्यानं टायगरला मिठी मारली. मात्र, दिशाच्या उल्लेखानं तिथलं सगळं वातावरण मस्ती-मस्करीचं झालं.  


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही काळापूर्वी ते विभक्त झाले. आता अशी चर्चा आहे की दिशा ही एका जिम ट्रेनरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर टायगरचे वडील जॅकी श्रॉफ, आई आयेशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफसोबत दिशाचे चांगले नाते आहे. दिशा अनेकदा त्यांच्यासोबत दिसते. 


हेही वाचा : Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता


 'बडे मिया छोटे मिया' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अक्षय आणि टायगर शिवाय, मनुषी छिल्लर आणि अलाया एफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानीनं केली आहे.