मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीने गेल्या आठवड्यात एक फोटो शेअऱ केला होता. दोघांना एकाच फोटोमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. हे दोघेही पुन्हा एकाच सिनेमात दिसणार की काय असे चाहत्यांना वाटले. अक्षय आणि सुनील यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलेय. यातील त्यांचा फेमस सिनेमा म्हणजे हेरा फेरी. 


अक्षय-सुनीलची केमिस्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात राजू आणि शाम या पात्रांनी तर चाहत्यांना खूप हसवले. अक्षय आणि सुनील यांचा एकत्रित फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटले की हेरा फेरीचा तिसरा भाग येतोय की काय?



दरम्यान अक्षय आणि सुनील हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात दिसणार नाहीत. मात्र दोघेही हाऊलफुल ४मध्ये दिसणार असल्याचे बोलले जातेय. यावेळी हाऊसफुलची कथा आणि कास्ट आधीच्या तीनही सिनेमांपेक्षा वेगळी असणार आहे. हाऊशफुल्ल ४मध्ये बॉबी देओल, अभिषेक बच्चन आणि कृती सॅनन यांचे नाव फायनल केले जातेय. 


दरम्यान हा सिनेमा अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. यात सुनीलही दिसू शकतो. याचे संकेत खुद्द सुनील शेट्टीनेही दिलेत. त्याने ट्वीटद्वारे हे संकेत दिलेत.