Akshay Kumar देश सोडणार; का आली अभिनेत्यावर अशी वेळ?
Akshay Kumar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या `सेल्फी` या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Akshay Kumar Applied For Indian Passport : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshy Kumar) हा सध्या त्याच्या 'सेल्फी' (Selfiee) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असला तरी देखील तो नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. ट्रोलर्स त्याला ट्रोल करण्याचे कारण म्हणजे त्याच्याकडे असलेलं कॅनडाचं नागरिकत्व. दरम्यान, आता अक्षयनं कॅनडाचं नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. अक्षय म्हणाला की भारत त्याच्यासाठी सगळं काही आहे. इतकंच काय तर त्यांनं पासपोर्टसाठी अर्ज देखील केला आहे.
अक्षयनं नुकतीच आजतकला मुलाखत दिली होती. आजतकच्या सीधी बातच्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या वेळी त्यानं खुलासा केला आहे की 'त्याला वाईट वाटतं जेव्हा त्यानं कॅनडाचं नागरीकत्व का घेतलं या मागचं कारण माहित नसताना उगाच काही बोलतात. अक्षय म्हणाला, भारत माझ्यासाठी सगळं काही आहे. मी जे काही कमावलं आहे, जे काही मिळवलं आहे, ते सगळं इथून मिळवलं आहे. मी सौभाग्यशाली आहे की मला भारताला ते सगळं पुन्हा देण्याची संधी मिळाली. मला खूप वाईट वाटतं जेव्हा लोक काही माहित नसताना काहीही बोलून जातात.'
हेही वाचा : Maanvi Gagroo ने लपून केलं लग्न! Four More Shots Please, Tripling मुळे आली प्रकाशझोतात
अक्षयनं त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला. 90 च्या दशकात अक्षयनं एकामागे एक असे 15 पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले होते. त्यानं बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्यानं कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज दिला होता, कारण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. याविषयी अक्षय म्हणाला, 'मला वाटले की माझे चित्रपट चालत नाहीत आणि काम तर करायचे आहे. मी तिथे कामासाठी गेलो होतो. माझा मित्र कॅनडामध्ये होता तर तो म्हणाला, 'इकडे ये'. मी अर्ज केला आणि कॅनडाचे नागरिकत्व मिळाले.'
अक्षयनं पासपोर्ट मिळवण्यासाठी केला अर्ज
अर्ज देण्याविषयी अक्षय म्हणाला, 'माझ्याकडे फक्त दोन चित्रपट होते जे काही दिवसात प्रदर्शित होणार होते आणि सुदैवानं ते दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. ते पाहून माझा मित्र मला म्हणाला की परत जा आणि पुन्हा कामाला लाग. त्यानंतर मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि मग अजून काम मिळत राहिले. माझ्याकडे कुठला पासपोर्ट आहे हे मी विसरलो? मला कधी वाटलं नव्हतं की मला पासपोर्ट बदलावा लागेल, पण आता त्याची गरज असल्याचे मला वाटते. मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे.