मुंबई : फोर्ब्सनं आशिया खंडातील 100 डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. बॉलिवूडच्या खिलाडी कुमार अक्षयनं या यादीत स्थान मिळवलं आहे. फक्त सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केलं म्हणून नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या कारणामुळंही त्याची इथं निवड करण्यात आली आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार अक्षय कुमारनं यंदाच्या वर्षी जवळपास 362 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सच्या या यादीत अक्षय कुमार सहाव्या स्थानावर आहे. फक्त सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करतो म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या कारणामुळंही त्याची इथं निवड करण्यात आली आहे.


20व्या वर्षापासून ते अगदी 78 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील सर्वच कलाकारांची नावं या यादीत आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अक्षयचे तब्बल 131 मिलियन फॉलोअर्स आहेत. कोरोना काळात अक्षयनं अनेक कलाकारांना मदत केली होती. 


या कठीण काळात अक्षय कुमारनं तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर्स इतकी रक्कम दान स्वरुपात दिली होती.अक्षय व्यतिरिक्त या यादीत भारतातून शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचाही समावेश करण्यात आलाय.