मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी हे दिग्गज कलाकारही असतील.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्गज अभिनेते आणि भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मते अक्षय कुमार  हा 'मिस्टर. क्लीन' आहे. त्यामुळे अक्षयला पंतप्रधानांची भूमिका शोभेल. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले की, पंतप्रधानांची भूमिका अक्षय कुमारशिवाय चांगली कुणी करुच शकणार नाही.


सध्या अक्षय कुमार त्याच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटाच्यासंदर्भात अक्षय कुमार पंतप्रधान मोदींनाही भेटला होता.