`बच्चन पांडे` चित्रपटातील अक्षयचा नवा अवतार
याआधी अक्षय कधीही अशा रुपात दिसला नव्हता
मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'बच्चन पांडे' असं या चित्रपटाचं नाव आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार अतिशय वेगळ्या अवतारात दिसत आहे. अक्षयने ट्विट करत याबाबत माहिती दिली. 'बच्चन पांडे' २०२० मध्ये ख्रिसमसमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद समजी करत आहेत.
साजिद नाडियाडवाला 'बच्चन पांडे'ची निर्मिती करणार आहेत. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. अक्षयच्या या लूकला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळत आहे.
अक्षय सध्या त्याच्या आगामी 'मिशन मंगल' चित्रपटात व्यस्त आहे. 'मिशन मंगल' १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'मिशन मंगल'मध्ये अक्षय एक वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. अक्षयशिवाय चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशीदेखील भूमिका साकारणार आहे.