मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ' पॅडमॅन'या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अवघ्या काही दिवसांवर चित्रपटाचीरिलीज डेट बदलण्यात आली आहे. 


राधिका आणि अक्षय कुमार  


'पॅडमॅन' चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार सॅनेटरी पॅड बनवणार्‍या एका पुरूषाचा संघर्ष पडद्यावर मांडणार आहे. या चित्रपटाला सत्यकथेचा संदर्भ आहे.
त्यामुळे रसिकांमध्येही या चित्रपटाबाबत विशेष आकर्षण आहे.  


अक्षय कुमार सोबत सोनम कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असली तरीही राधिका आपटेदेखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 


राधिका 'पॅडमॅन'मध्ये अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.  


मराठीत गप्पा 


'पॅडमॅन'च्या प्रमोशनमध्ये सध्या सोनम, राधिका आणि अक्षय कुमार खूपच व्यस्त असले तरीही हे तिघं मजामस्तीदेखील करत आहे.  


 



 


राधिकाशी अक्षय कुमार मराठीत गप्पा मारत असल्याचा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राधिका अक्षयकुमारचे चित्रपट पाहत मोठी झाल्याचे सांगते. त्यानंतर अक्षयनेही तिला काही चित्रपटांची नावं आणि त्याबद्दल माहिती विचारली. मात्र तेव्हा राधिकाची त्रेधातिरपिट उडाल्याचं दिसत आहे.