Akshay Kumar Trolled For Spliting in Ganga: अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांसमोर आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. परंतु सध्या या टीझरमधील एका दृश्यामुळे मात्र सर्वत्र चर्चांना उधाण आलं आॉलसहे. सध्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या चर्चा म्हणजे गंगेतून डुबकी मारून बाहेर आल्यानंतर  तो पाण्यात थुंकला का यावर सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु यावेळी त्याच्या सपोर्टमध्येही अनेक फॅन्स आले आहेत. त्यानं यावेळी पाण्यातून बाहेर येताना तो अजिबातच थुंकला नाही असं फॅन्स म्हणताना दिसत आहेत. परंतु नक्की ही क्रिया त्यानं केली आहे की नाही आणि यावरून नक्की का मतमतांतरे आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्याच्या या दृश्यातून तो थूंकतो आहे की नाही यावर अनेकांनी चर्चासत्रं सुरू केले आहे. सध्या एक कॅप्शन सर्वत्र फिरताना दिसत आहे आणि ते म्हणजे ''कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी गंगेत थुकणं हे नवीन सामान्य गोष्ट आहे.'' सध्या यामुळे अक्षय कुमार हा चांगलाच ट्रोल झालेला आहे. तर काहीजणं त्याच्या सपोर्टमध्येही आलेले आहेत. ''हटर्सना काही ट्रोलिंगसाठी मिळत नाहीये म्हणून अक्षय कुमार हा गंगेत थूंकतो आहे असा नवीन नारा सुरू केला आहे.'' @ArunRChaudhary1 या ट्रोलरनं याविषयी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या वरून अनेक मतमतांतरं पाहायला मिळत आहेत. त्यातून सध्या या दृश्यावरून सोशल मीडियावर वादही पेटलेला दिसतो आहे. 


हेही वाचा - सनी देओलच्या 'गदर 2'ला टक्कर द्यायला येतोय अक्षय कुमारचा OMG 2; पाहा अफलातून Teaser


बॉलिवूड पुन्हा ट्रोलिंगच्या निशाण्यावर?


सध्या 'आदिपुरूष' या चित्रपटावरून सर्वत्र तिखट प्रतिक्रिया येत असताना आता 'ओह माय गॉड' या चित्रपटावरूनही नवीन वादंग सुरू झाला आहे. त्यामुळे आता बॉलिवूड पुन्हा एकदा ट्रोलिंगच्या निशाण्यावर आहे का असे चित्र समोर येते आहे. ट्विटवरून नानाविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 




अक्षय कुमार खरंच थुकंला का? 


सध्या या टीझरच्या एका सीनमध्ये गंगेतून डुबकी लावल्यानंतर पाण्यातून बाहेर येताना तोंडातलं पाणी बाहरे काढतो आहे परंतु त्यात तो थुंकला आहे असा जावईशोध नेटकऱ्यांनी दाखवला आहे. समोर आलेल्या सीनमध्ये तो जाणून बजून थंकताना दिसत नाहीये परंतु नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही क्रिया त्यांन केली आहे.