Akshay Kumar investment Uttra Pradesh : देशात दोन फिल्मसिटी असून त्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातील एक ही मुंबईत आणि दुसरी हैद्राबादमध्ये आहे. या दोन्ही फिल्मसिटीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांचं शूटिंग होतं. येणाऱ्या काळात नोएडामध्ये देखील फिल्म सिटी येणार आहे. या प्रोजेक्टची घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये घोषणा केली होती. आता रिपोर्ट मिळाली आहे की अक्षय कुमारसोबत अनेक सेलिब्रिची या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्नुसार, या प्रोजेक्टचे तीन फेज असणार आहेत. ज्याच्या पहिल्या फेजमध्ये सरकारकडून टेंडर काढण्यात येईल आणि त्यासाठीच अक्षय कुमारची कंपनी ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ आणि बोनी कपूरच्या ‘बेव्यू प्रोजेक्ट’, ‘लॉयन्स फिल्म्स प्राइवेट लिमिटेड’ आणि टी-सीरीजसोबतच अनेक कंपन्या हा टेंडर भरणार आहेत. 


1000 एकरमध्ये होणार तयार


ही फिल्म सिटी 1000 एकरमध्ये तयार होणार आहे. TOI नं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, 740 एकर जागा ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी असेल. त्यातील 40 एकरच्या जागेत फिल्म इंस्टिट्यूट असेल. या फिल्म सिटीमध्ये 120 एकरच्या परिसरात अम्यूजमेंट पार्क तयार होईल आणि उरलेली 100 एकर जागा ही कमर्शिअल वापरासाठी असेल. दरम्यान, असं म्हटलं जातं की यात मंडिया इंडस्ट्रीचे ऑफिस, थीम पार्क, हॉटेल आणि रिटेल स्टोर देखील असतील. 


हेही वाचा : सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चां, शोएब मलिकनं केला तिसरा निकाह


10 हजार कोटींचा प्रोजेक्ट


रिपोर्टविषयी बोलायचे झाले तर हा प्रोजेक्ट 10 हजार कोटींचा असेल. असं म्हटलं जातं की या तिन्ही फेजचं काम हे 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. तर या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्यासाठी अक्षय कुमार आणि इतक सेलिब्रिटी टेंडर भरणार आहेत. ही फिल्म सिटी यासाठी खास आहे की कारण ही फिल्म सिटी जेवर विमानतळाच्या फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. रिपोर्टनुसार, फिल्म सिटीला पॉड टॅक्सीच्या माध्यमातून विमानतळाशी जोडण्यात येणार आहे.