अक्षय कुमारने मुलाला दिल्या अशा खास शुभेच्छा
बॉलिवूडमध्ये `खिलाडी` म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार आपल्या कुटुंबाबद्दल फारच पझेसिव्ह आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार आपल्या कुटुंबाबद्दल फारच पझेसिव्ह आहे.
हिंदी सिनेमातील करिअर , कौटुंबिक जबाबदारी आणि त्यासोबतच सामाजिक भान यशस्वीरित्या अक्षय सांभाळत आहे.
आज अक्षय कुमारचा मुलगा आरवचा १५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त आरवसाठी अक्षयने खास पोस्ट शेअर केली आहे.
‘झाडावर कसे चढायचे हे मी तुला शिकवले त्यांतर व्हिडिओ कॉल कसा करायचा हे मी तुझ्याकडून शिकलो…. माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…’अशा शब्दात आरवचा खास फोटो शेअर करत अक्षयने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.