अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांना लागणार ब्रेक? या भन्नाट चित्रपटाचा सिक्वेल तारणार करिअर
20 वर्षांनी पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा एकत्र दिसणार आहेत. लवकरच `भागम भाग 2` प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bhagam Bhag 2 Announcement: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. 'भागम भाग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. त्यानंतर अक्षय कुमारने शेमारूकडून या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून तो या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता चाहत्यांची अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे.
अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा यांचा 2006 मध्ये 'भागम भाग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खूपच कॉमेडी होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले होते. त्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'भागम भाग' चित्रपटाचा सिक्वेल येणार असून या चित्रपटात जुनेच कलाकार असणार असल्याचं म्हटलं आहे.
अक्षय कुमारे विकत घेतले चित्रपटाचे हक्क
अक्षय कुमार हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये कामं केलं आहे. ज्यामध्ये त्याचे काही चित्रपट हिट झाले तर काही चित्रपट फ्लॉप ठरले. अक्षय कुमारने अनेक कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ज्यामध्ये 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'गरम मसाला' अशा चित्रपटाचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'हेरा फेरी' आणि 'भागम भाग' या चित्रपटाचे फ्रेंचायझी हक्क विकत घेतले आहेत. सध्या अक्षय कुमार आपल्या टीमसोबत या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे.
कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?
अक्षय कुमार सध्या अनेक चित्रपटांवर काम करत आहे. नुकतीच अक्षय कुमारने 'भागम भाग 2' चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच हा चित्रपट 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे. नुकताच अक्षय कुमार 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसला होता. आता अक्षय कुमार अनेक चित्रपटांवर आपल्या टीमसह काम करत आहे. ज्यामध्ये 'हाऊसफुल 5', 'स्काय फोर्स', 'भूत बांगला', 'जॉली एलएलबी 3' आणि 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटांचा समावेश आहे.