मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट 'केसरी'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत कोटींचा गल्ला जमवला. सारागढीच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित 'केसरी'ला चाहत्याची चांगलीच पसंती मिळाली. चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेचंही चाहत्यांनी कौतुक केलं. बॉलिवूड चित्रपट भारतासह विदेशातही पाहिले जातात. आता अक्षय कुमार स्टारर 'केसरी' जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 हजार आक्रमणकर्त्यांविरुद्ध 21 धाडसी सैनिकांनी दिलेल्या लढ्यावर आधारित 'केसरी' 16 ऑगस्ट 2019 मध्ये जपानमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 



झी स्टूडिओ इंटरनॅशनलने चित्रपटाला जगभरातील 55 भागात प्रदर्शित करण्याची जबाबदारी घेतली आहे. आता झी स्टूडिओ इंटरनॅशनल जपानमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. 


अनुराग सिंह दिग्दर्शित 'केसरी'मध्ये परिणीती चोप्रानेही प्रमुख भूमिका साकारली आहे. 'पॅडमॅन'नंतर अक्षयचा या भागात प्रदर्शित होणार 'केसरी' दुसरा चित्रपट आहे.