मुंबई : अक्षय कुमारने घेतला सर्वात मोठा निर्णय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा पॅडमॅन या सिनेमाची प्रदर्शणाची तारीख बदलली आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 25 जानेवारी रोजी अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा एकत्र प्रदर्शित होणार होता. आपल्याला माहित आहे की, पद्मावत या सिनेमावरून अनेक वाद झाले. सुप्रीम कोर्टाने दिलासा देऊनही पद्मावत या सिनेमाला करणी सेनेचा अजूनही कडाडून विरोध केला आहे. 


25 जानेवारीपासून मोठा विंकेड सुरू होत आहे. याचं औचित्य साधून हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होणार होते. मात्र आता अक्षय कुमारने आपला सिनेमा मागे घेतला आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी फक्त पद्मावत सिनेमा प्रदर्शित होत आहे. 



पत्रकार परिषद घेऊन अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांनी ही बाब समोर आणली. अक्षय कुमारने घेतलेल्या या निर्णयामुळे संजय लीला भन्साळी यांनी अक्षयचे आभार मानले आहेत. अक्षयने घेतलेला हा मोठा निर्णय आहे. आणि त्याची ही गोष्ट मी कधीच विसरणार  नाही असं भन्साळी म्हणाले.