मुंबई : झी मराठी वाहिनी वरील तुझ्यात जीव रंगला हा कार्यक्रम अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. या मालिकेती राणा-अंजली ही पात्र तर इतके हिट झाले की, आजही त्याचं नावाने प्रेक्षक त्यांना ओळखतात. या मालिकेनंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे सोबतीही झाले. या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो व्हिडीओ शेअर करत असते. आता नुकताच एक व्हिडीओ अभिनेत्री पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिंने चिंता आणि खंत व्यक्त केली आहे.
 
इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत ती म्हणाली आहे की, ''नमस्कार मी अक्षया देवधरा. थांबा  दोन मिनीटं व्हिडीओ स्क्रोल नका करु कारण की मी आज तुम्हाला खूप महत्वाची माहिती द्यायची आहे. सध्या कॅन्सरचं प्रमाण सगळीकडेच खूप वाढलेलं आहे आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे दोन्हीही कॅन्सर मोस्ट कॉमन आहेत. तर यावर उपाय काय? असा आपल्याला कायमच प्रश्न पडतो. तर  सर्वायकल कॅन्सरवर एक वॅक्सिन आलेलं आहे. ज्याचं नाव hpv वॅक्सिन असं आहे. याचे तीन डोस उपलब्ध आहेत. आणि त्या तिन्ही डोसचा कोर्स आपल्याला पुर्ण करायचा असतो. मला हे सांगायला खेद वाटते की, मला ही गोष्ट माहिती नव्हती. हे वॅक्सिन येवून आता बराच काळ झालेला आहे. तरी सुद्धा महिलांमध्ये अवेअरनेस पसरलेला नाही. मलाही हे माहिती नव्हतं. पण आता मला ही गोष्ट कळल्या कळल्या वॅक्सिनचे डोस कम्लिट केले आहेत. आणि आता माझा सेकेंड डोस झालाय, तिसऱ्या डोससाठी आता मला थांबायचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मला असं वाटतंय, तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा अवेअरनेस पोहचणं गरजेचं आहे. तुम्ही पुरुष हा व्हिडीओ आता कोणी बघत असतील तर तुमच्या आजुबाजूला कोणीही महिला असतील. मुली असतील तर त्यांच्या पर्यंत ही माहिती पोहचवा. तुम्हाला कुठे घ्यायचं वॅक्सिन हा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या स्त्री रोगतज्ञाचा आधी सल्ला नक्की घ्या. त्यांच्या कन्सल्टेशनने तुम्ही तुमची पुढची प्रोसेस करु शकता. कमीत कमी तुम्ही तुमच्या gynaclogist ला भेटा . याबद्दलची माहिती घ्या आणि जर कोणा gynaclogist कडे हे वॅक्सिन उपलब्ध नाहीये. किंवा तुम्हाला gynaclogist कडे जायचं माहितीच नाहीये असा काही प्रश्न असेल तर पुण्यात आपटे रोडवर माझे पर्सनल  gynac आहेत. त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांच्याकडे हे वॅक्सिन आहे. तर प्लिज याबाबतची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आपण करुया.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कारण वयाच्या ९व्या वर्षा पासून आपण हे वॅक्सिन घेवू शकतो. जितकं लवकर हे वॅक्सिन घेतलं जाईल. तितका जास्तीत जास्त फायदा होणार आहे मुलींना. तर प्लिज ज्यांनी घेतलं नाहीये त्यांनी प्लिज घ्या. आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचलेली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा आपण प्रयत्न करुया.  आणि या वॅक्सिनचा वयोगट आहे ९ ते ४५ वर्ष  परंतू जितक्या लवकर हे वॅक्सिन घ्याल तितका फायदा तुम्हाला होणार आहे आणि थॅक्यू मला तुमचा वेळ दिल्या बद्दल.'