दारुच्या व्यसनामुळे प्रसिद्ध दिग्दर्शकला जावं लागलं होतं व्यसन मुक्ती केंद्रात; गेला होता डिप्रेशनमध्ये
हा चित्रपटसृष्टीत जितका सक्षम दिग्दर्शक आहे तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही वादात सापडले आहे. कोणत्याही मुद्द्यावर असलेले त्याचे मत तो स्पष्टपणे मांडत असतो.
Anurag Kashyap Alcohol Addiction : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. अनुराग कश्यप त्याच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. कोणत्याही मुद्द्यावर असलेले त्याचे मत तो स्पष्टपणे मांडत असतो. सध्या अनुराग त्याच्या आगामी 'अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' (Almost pyaar with DJ Mohabbat) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान अनुरागनं स्वत:बाबत एक मोठा खुलासा केला आहे. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अनुराग कश्यप हा चित्रपटसृष्टीत जितका सक्षम दिग्दर्शक आहे तितकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही वादात सापडले आहे. एकेकाळी अनुराग कश्यप पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता की अनुराग कश्यपच्या दारूच्या व्यसनामुळे त्याला एकदा नव्हे तर तीनदा पुनर्वसन केंद्रात जावं लागलं होतं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्याने तीन वर्षांहून अधिक काळ डिप्रेशनचा सामना कसा केला हे उघड केलं. अनुरागने हे देखील सांगितलं की त्याच वेळी त्याची मुलगी आलिया कश्यपला 'पॅनिक अटॅक' येऊ लागले. 2019 मध्ये जेव्हा अनुरागने ट्विटर सोडलं तेव्हा त्याच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या कशा मिळाल्या आणि तिला कसं ट्रोल केलं गेलं हेही त्याने सांगितलं.
'द लालन टॉप'शी बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, 'मी अडीच वर्षे खूप आजारी होतो, आधी दोन्ही कान फाटले. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. मी बराच वेळ डायव्ह बोटीवर राहिलो कारण डायव्हिंग करताना माझे कान फाटले होते आणि मला खूप कमी ऐकू येत होतं. कान बरे होईपर्यंत बोटीवर राहिलो. एक महिन्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर दम्याचा झटका आला.
माझं व्यसन वाढलं. माझा व्यायाम थांबला, मी बाहेरून जेवण मागवू लागलो. एक एक करून माझी तब्येत खालावत राहिली. त्यानंतर मला दम्याचा अटॅक आला, मी दारू पिणं बंद करण्यासाठी पुनर्वसनात गेलो, तेव्हा माझ्या पायाची नस फुटली, त्यानंतर मला सुमारे 4 महिने व्हील चेअरवर बसां लागलं, यामुळे मी पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली. यानंतर पुन्हा दम्याचा झटका आला. अडीच वर्षांपासून तब्येत ढासळत राहिली." अनुरागने सांगितले की, त्यानंतर त्याने त्याच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि आता तो बरा आहे.
धमक्या मिळाल्यानं मुलगी त्रासली होती
अनुराग कश्यपच्या मुलीलाही (Aaliyah Kashyap) ट्विटरवर खूप ट्रोल करण्यात आले आहे, तिची मुलगी आलिया कश्यपलाही बलात्काराच्या धमक्या आल्या होत्या, त्यानंतर अनुरागच्या मुलीला अॅन्झायटी अटॅक येऊ लागले होते. याबाबत बोलताना अनुराग म्हणाला, 'माझ्या मुलीला ट्रोल करण्यात आले होते, बलात्काराच्या धमक्या मिळत असल्यानं मी ट्विटर सोडलं होतं. त्याला अॅन्झायटी अटॅक येऊ लागले, म्हणूनच मी ट्विटरपासून दूर गेलो आणि पोर्तुगालला गेलो. त्यानंतर अनुरागनं लंडनमध्ये त्याच्या 'अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या चित्रपटाचं शूटिंग केलं. दरम्यान, अनुरागनं सांगितलं की, या काळात आणि चित्रपट बनवताना त्यानं मुलीला वेळ दिला. तिच्यासोबत अनेक गोष्टी एक्सप्लोअर केल्या.