`भारत` सिनेमात सलमान खानसोबत `या` अभिनेत्याची होणार एन्ट्री?
रेस 3 नंतर सलमान खान कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार?
मुंबई : रेस 3 नंतर सलमान खान कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. सध्या सलमान खान 'दबंग टुर' साठी अमेरिकेच्या दौर्यावर आहे. या दौर्यावरून परतल्यानंतर सलमान खान 'दबंग 3' ऐवजी 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे.
बहुप्रतिक्षित सिनेमा
अली अब्बास जफर आणि सलमान खान ही जोडी 'टायगर जिंदा है', 'सुलतान' नंतर 'भारत' हा सिनेमा घेऊन येणार आहे. हा चित्रपट सलमान सोबतच अलीसाठी देखील खास सिनेमा आहे. सलमान खानसोबत प्रियंका चोप्रा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यांच्या सोबतीला अली फजल हा अभिनेता 'भारत'मध्ये झळकणार आहे असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. बॉलिवूड लाईफच्या माहितीनुसार अली फजलने अजूनही या चित्रपटाबाबत खुलासा केलेला नाही. इतर प्रोजेक्ट्सचे काम पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाबाबत तो निर्णय घेणार आहे.
कोरियन सिनेमाचा रिमेक
'भारत' हा कोरियन सिनेमा 'ओड टू माई फादर'चा हिंदी रिमेक आहे. 'ओड टू माई फादर' यामध्ये 1950 ते 2014 या काळामधील घटना एक सामान्य नागरिकाच्या नजरेतून व्यक्त करण्यात आल्या आहेत. भारत सिनेमामध्येही स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि सद्यस्थिती या दरम्यानच्या घटना सलमान खानच्या नजरेतून रूपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे.