मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चां दरम्यान एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे. कारण एका साडी फॅशन ब्रँड आणि डिजायनरसोबत आलिया आणि रणबीरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या डिझायनरसोबत तिचा फोटो व्हायरल होत आहे, ती ब्रायडल साडी डिझाईनसाठी ओळखली जाते. 



एकंदर कपूर आणि भट्ट कुटुंबाची उत्सुकता पाहात आलिया आणि रणबीरचं लवकरचं लग्न होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान, ब्राइडल कांचीपुरम साडी ब्रँडच्या सीईओ बीना कन्नन यांनी फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 


या फोटोत त्याच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्टही उभे आहेत. फोटो शेअर करत त्यांनी आलिया आणि रणबीरला टॅग देखील केलं आहे. सध्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.