आलिया भटनं केलं रणबीरच्या ex-गर्लफ्रेंडला कॉपी...लूक पाहून नेटकरी म्हणाले....
अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकऱ्यांना रणबीरच्या ex-गर्लफ्रेंडची आठवण झाली
मुंबईः अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकऱ्यांना रणबीरच्या ex-गर्लफ्रेंडची आठवण झाली.
आलियाने फ्लेर्ड पॅंटसह डीप नेक ऑफ व्हाइट क्रॉप टॉप आणि ओव्हरसाईज Gucci ब्रँडचं जॅकेट घातलं होतं. तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना रणबीरच्या ex-गर्लफ्रेंडची आठवण झाली
बॉलीवूड सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक्स अनेकदा व्हायरल होतात. अलीकडेच नवविवाहित अभिनेत्री आलिया भट्टच्या एअरपोर्ट लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली... अभिनेत्रीचा ड्रेस, हेअरस्टाईल आणि चाल पाहून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
आलिया चेहऱ्यावर मास्क, डोळ्यांवर गोल चष्मा आणि बन शेपच्या हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. तिला पाहून कोणीही आलियाला दीपिका समजेल. अशा परिस्थितीत युजर्सनी दीपिकाची कॉपी केल्यामुळे तिच्यावर कमेंटही केल्या आहेत.
एका यूजरने लिहिले - 'अफोर्डेबल दीपिका'. दुसऱ्याने लिहिले- 'दीपिका स्पष्टपणे कॉपी करत आहे.' दुसर्याने लिहिले- 'दीपिका वाव'. 'दीपिका कॉपी'. दीपिका पदुकोणची फॅशन कॉपी'. काही यूजर्सनी आलियाच्या मास्ककडेही लक्ष दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आलियाने मास्क उलटा लावला आहे.
दीपिका पदुकोणचा हा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी आलिया भट्टला का ट्रोल करत आहेत याचा अंदाज येईल. दीपिका पदुकोणचा लूक आणि तिची स्टाइल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. अभिनेत्रीचा पार्टी लूकच नाही तर एअरपोर्ट लूकही खूप चर्चेत येतो.