राम रहिममुळे अडचणीत सापडली अभिनेत्री आलिया भट
२५ ऑगस्टला सीबीआय कोर्टाने राम रहिमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आणि आज(२८ ऑगस्ट) ला त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
नवी दिल्ली : २५ ऑगस्टला सीबीआय कोर्टाने राम रहिमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आणि आज(२८ ऑगस्ट) ला त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याला दोषी ठरवण्यात आलं तेव्हा पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मोठा हिंसाचार भडकला. यामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिला देखील याचा फटका बसला.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट तिच्या आगामी ‘राजी’ सिनेमाच्या शुटिंगसाठी पटियाला येथे गेली होती. मात्र, विवादानंतर तिच्या सिनेमाचं शुटिंग ठप्प झाली आणि आलिया भट अजूनही पटियालामध्ये अडकून पडली आहे. तिच्यासोबत सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि विक्की कौशल हे सुद्धा आहेत.
मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या सिनेमात आलिया भटसोबत विक्की कौशल हा मुख्य भूमिकेत आहे. मिड डेमध्ये आलेल्या वॄत्तानुसार, गेल्या शुक्रवारी दुपारी सिनेमाचं शुटिंग तेव्हा थांबवण्यात आलं, जेव्हा राम रहिमला दोषी ठरवण्यात आलं.