मुंबई : जिथे आलिया - रणबीरच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. तिथे आता आणखी चर्चांना उधाण आलं आहे. आलिया भट्टने रणबीरबाबत असं काही बोललं आहे ज्यामुळे रणबीर नक्कीच खूष होईल. रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांतील रणबीरच्या रोलचं भरपूर कौतुक केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं कौतुक होत असताना आलियाने शुक्रवारी या सिनेमासाठी रणबीरला खास प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला माहितच आहे आलिया - रणबीर सध्या त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आलं आहे. आलिया - रणबीर एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं आहे. आता या सिनेमांकरता आलियाने म्हटलं आहे की, हा सिनेमा मला भरपूर आवडला आहे. हा सिनेमा अतिशय उत्कृ्ष्ठ आहे. माझ्या 10 आवडत्या सिनेमांमध्ये संजू हा सिनेमा आता विराजमान झाला आहे. या सिनेमामध्ये रणबीर कपूरने कमाल काम केलं आहे. विक्की कौशल आणि परेश रावल यांनी देखील खूप चांगल काम केलं आहे. अनुष्का शर्मा आणि सोनम कपूरने देखील उत्तम काम केलं आहे. हा फुल पॅकेज सिनेमा आहे. 



रणबीर-आलियाला दिले हे नाव


वृत्तानुसार, चाहत्यांनी यांनाही विशेष नाव दिले आहे. ते आहे रालिया. सोशल मीडियावर रणबीर-आलियाचे हे नाव अतिशय लोकप्रिय झाले आहे. अजूनही रणबीरसोबतच्या नात्यावर आलिया काहीही बोललेही नाही. पण रणबीर काही इशाऱ्यातून याबद्दल काही ना काही बोलत आहे.